अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अंतरवाली सराटी येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये आणि बीड जिल्ह्यात तीव्र शोककळा पसरली आहे.
दशरथ रायकर (रा. संगम, ता. जि. बीड) असे मृत्यू झालेल्या निष्ठावंत मराठा आंदोलकाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दशरथ रायकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडहून अंतरवाली सराटी येथे आले होते. गुरुवारी रात्री उशिरा अंतरवाली परिसरातील एका शेतात ते इतर आंदोलकांसोबत झोपले होते. पण शुक्रवारी सकाळी सर्वजण उठल्यानंतर रायकर हे झोपेतून उठलेच नाहीत.

सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उपस्थित आंदोलकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

दशरथ रायकर यांचा मृत्यू अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. रायकर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles