महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पिकं सुकून चालली आहेत, संपूर्ण ऑगस्ट महिना उलटला मात्र राज्यात एकही थेंब पाऊस पडलेला नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. बळीराजाला पावसाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता एक गुडन्यूज समोर आली आहे, राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना नवा अंदाज आता समोर आला आहे. पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी आहे.दोन, तीन आणि चार सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, राज्याचा विचार केल्यास नागपूरमध्ये तसेच पूर्व विदर्भात तीन, चार आणि पाच सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणाम म्हणून पश्चिम विदर्भात देखील पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र विषेत: पुणे जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे, पावसाचं स्वरुप विखरूलेलं असेल म्हणजे कुठे पाऊस पडेल कुठे पडणार नाही, मात्र बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, ज्यामध्ये गोंदिया, भंडारा, वर्धा नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. पश्चिम विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण तिकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. चार सप्टेंबर पासून ते आठ सप्टेंबर पर्यंत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कमी दाबाचा पट्टा हा गुजरातकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या काळात पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात देखील राज्यात चांगला पाऊस होणार आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात अगदी पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, आज रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच सक्रिय होणार आहे, असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles