नगरमध्ये ट्रॅव्हल जिहाद विरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक;हिंदू महिलांसह नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन

ट्रॅव्हल जिहाद विरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक

रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन

अहिल्यानगर – नगर पुणे शिवशाही बसमध्ये मुस्लीम कंडक्टरने एका हिंदू महिलेची छेद काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आ.संग्राम जगताप हे चांगलेच आक्रमक झाले. या नव्या ट्रॅव्हल जिहाद विरोधात सकल हिंदू समजाच्या वतीने आज सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रस्ता रोको आंदोलना सहभाग घेतला. हिंदू प्रवासी महिलेची छेद काढणाऱ्या मुस्लीम कंडक्टरवर जोवर गुन्हा दाखल होत नाही व त्याची प्रत प्राप्त नाही तोवर रस्त्यावरून उठणार नाही व आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूनिका आ.संग्राम जगताप यांनी घेतल्यावर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सुमारे तासाभराने पोलिस अधिकाऱ्यांनी सबंधित कंडक्टरवर गुंग दाखल केल्याची प्रत आ.संग्राम जगताप यांना दिल्यावर हे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले, नगरमध्ये आपण लव्ह, लँड, व्होट जिहाद विरोधात आंदोलने केली. पण आता नाशिक मध्ये आयटी जिहाद व नगरमध्ये ट्रॅव्हल जिहादचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आपल्या महिला भगिनींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या विरोधात सर्व हिंदू महिला नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. महिलांनी मुस्लीम समजाचे षडयंत्र समजून घ्या, वेळीच सावध व्हा. हा समाज सातत्याने हिंदू समजावर अत्याचार करत आहेत. आता हे सहन न करता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आ.जगताप यांनी केले.

ते पुढे म्हणाले, नगरमध्ये जिहादी वृतींकडून असे वेगवेगळ्या जिहादचे प्रकार वाढत आहेत. हिंदू महिलांनी आत जागरूक झाले पाहिजे. ज्या बस, रिक्षा व गाडीने महिला प्रवास करत असतील त्या गाड्यांचे ड्रायव्हर व कंडक्टर हे हिंदू आहेत की नाही याची खात्री करूनच त्या गाडीने प्रवास करा. या आधीही ज्या घटना घडल्या त्याविरोधात कडक कारवीची मागणी शासनाकडे केली आहे. शासन त्यावर कारवाई करेलच. पण आपण सर्वांनी जागरूक होऊन एकजूट दाखवली पाहिजे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत सर्व हिंदू समाज एकवटल्याने बांगलादेशी जीहाद्यांचे काहीही चालले नाही. अशी एकजूट आता अंतर्गत मतभेद विसरून महाराष्ट्रात दाखवा. हिंदू हा ओरीजनल हापूस आंबा असून हे जिहादी बाहेरून आलेले मिक्स ब्रीडचे कलमी आंबे आहेत. त्यामुळे आपण या ब्रीद पासून लाभ राहावे, असे हि आवाहन त्यांनी केले

यावेळी महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, महिला पदाधिकारी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जय श्रीराम…., भारतमाता की जय, जो हिंदू हित बात करेगा वही देश पे राज करेगा.. आशा जोरदार जोशना देण्यात आल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles