जलजीवनचा कोट्यावधींचा घोटाळा ; राज्यातील पहिली कारवाई अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे 6 अधिकारी निलंबित

जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनांतही
गंभीर त्रुटी, आर्थिक मोठी तफावत

अहिल्यानगरला जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहा अधिकारी निलंबित

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेल्या जलजीवन योजनेच्या कामातही गंभीर त्रुटी, मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
जलजीवनच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्रुटी व आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या चार अधिकाऱ्यांवर कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही निलंबित करण्यात आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जलजीवन बाबतची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करुनही लोकांना जलजीवन योजनेच्या पाणी पुरवठा योजनांतून पाणी मिळाले नाही. यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी तक्रार केली होती. पहिल्या टप्प्यात तपासणीत निकृष्ट कामे, गंभीर त्रुटी, आर्थिक विषमता आढळल्याने जबाबदार धरुन व पुढील निपक्ष चौकशी करता यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेचे कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता व नेवासा उपविभागाचे उपअभियंता असे चार अधिकारी निलंबित केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेही पाणी पुरवठा योजनांची कामे केली. जिल्हा परिषदेकडे जलजीवनच्या ८३० योजना आहेत. त्यापैकी सात सदस्य समितीने १० तालुक्यांतील ५३३ योजना पैकी १६ योजनांची खर्चाच्या अनुषंगाने व १५ योजनांची गुणवत्तेच्या दृष्टाने झालेल्या तपासणी गंभीर त्रुटी, आर्थिक मोठी तफावत आढळली आहे. ज्या योजनांवर मुख्य निरीक्षणे व स्ट्रक्चरल निरीक्षणे नोंदविण्यात आली तेथे तपासणीत निकृष्ट कामे, गंभीर त्रुटी, आर्थिक विषमता आढळल्याने जबाबदार धरुन व पुढील निपक्ष चौकशी करता यावी यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण, तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एस. गडधे, उपअभियंता पी. आर. संवत्सरकर, उप अभियंता आर. पी. पीसे, तत्कालीन शाखा अभियंता डी. व्ही. परदेशी, तत्कालीन उपअभियंता पी. बी. जायभाये यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव रंगा नायक यांनी निलंबित केले आहे.

शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही लोकांना जलजीलनच्या योजनांतून पाणी मिळाले नाही. कामे व्यवस्थित केली नाहीत. शिवाय खर्च केलेल्या पैशात व कामांत तफावत आढळणे गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवनच्या कामाची चौकशी आणि कारवाई करत आहेत. या योजनेतून ज्या-ज्या अधिकाऱ्यांनी आर्थिक लाभ उठवला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे. आता काही लोकांवर कारवाई झाली, पण सर्व दोषींवर कारवाई व्हावी आणि शासनाचे कोट्यवधी रुपये वाया घातले. त्याची संबंधिताकडून वसुली झाली पाहिजे अशी मागणी आहे.

संभाजी दहातोडें, प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.

1.श्री.एस. एस. गडधे, तात्कालीन कार्यकारी अभियंता (प्र.),
ग्रा.पा.पु. विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर.

(सध्या कार्यरत उपअभियंता, ग्रा.पा.पु. उपविभाग, वेल्हा,जि.प. पुणे)

2.श्री.पी. बी. जायभाये, तात्कालीन उप अभियंता,
ग्रा.पा.पु. विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर.

3.श्री.पी. आर. संवत्ससकर, उप अभियंता,
ग्रा.पा.पु. विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर.

4.श्री.डी. व्ही. परदेशी,
तात्कालीन शाखा अभियंता,
ग्रा.पा.पु.विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर.

5.
श्री. एच. बी. चव्हाण,
कार्यकारी अभियंता
ग्रा.पा.पु.विभाग
जिल्हा परिषद अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर.

6.श्री.पी. आर. संवत्ससकर, उप अभियंता,
ग्रा.पा.पु. विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles