Saturday, November 15, 2025

वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? कोर्टाच्या सुनावणीनंतर उज्ज्वल निकम म्हणाले….

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 22 जुलै रोजी होणार आहे. तसेच वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती बाबतच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती. यावेळी वाल्मिक कराडला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर देखील न्यायालय येत्या 22 जुलै रोजी निर्णय देणार असल्याची माहिती उज्वल निकम यांनी दिली.

तसेच वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? का संदर्भात सरकारी वकील उज्वल निकम यांनी माहिती देत सांगितलं की, वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात असल्याचे ही ते म्हणाले. वाल्मीक कराड याच्या दोष मुक्ती अर्जाचा निकाल माननीय न्यायालय येत्या 22 जुलै रोजी देणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केलं. त्याच प्रमाणे आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत सरकारच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. त्याचा देखील युक्तिवाद दोन्ही वकिलांमार्फत करण्यात आला. त्याचा देखील निकाल येत्या 22 जुलै रोजी होणार आहे. असे आज न्यायालयाने घोषित केलं. इतर आरोपींचे देखील जे अर्ज होते ज्यामध्ये आरोपींची प्रॉपर्टी जप्त करू नये, यावर अर्जांवर देखील 22 जुलैलाच निर्णय होणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

वाल्मीक कराडला कुठल्या तुरुंगात ठेवणं हे अधिक सुरक्षित राहील, याबाबत मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासनच याबाबत निर्णय घेईल. न्यायालयात त्या संदर्भात अद्याप कुठलाही अर्ज आलेला नाही. तसेच याबाबत न्यायालयाने देखील आमच्याकडे विचारणा केलेली नाही. अशी माहिती देखील ऍडव्होकेट उज्वल निकम यांनी दिली. वाल्मिक कराड याचे बँक अकाउंट सील करण्याची कारवाई रद्द करावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली होती. तसेच प्रॉपर्टी जप्तीसाठी केलेल्या अर्जावर देखील येत्या 22 जुलैला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या सुनावणी वेळी कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज यापूर्वी दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद देखील झाला आहे. आजच्या सुनावणीत बँक खाते तसेच चल-अचल संपत्ती यावर लावलेले सील काढावे, अशी मागणी आमच्याकडून करण्यात आली. सदरील बँक खाते तसेच सदरील प्रॉपर्टी ही कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाही, तसेच या गुन्ह्याचा व त्या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही. असा युक्तिवाद करण्यात आला. दोष मुक्तीचा अर्ज तसेच प्रॉपर्टीवरील सील हटवण्याबाबतचा अर्ज यावर युक्तिवाद झाला असून या दोन्ही अर्जावरील निर्णय अपेक्षित आहे. असेही वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे काय म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles