आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… पंकजा मुंडे यांचं खळबळजनक विधान

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान राज्यात सध्या सुरू आहे. कालपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी ताकद लावली. 5.30 पर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, 12 दिवस नाही तर गेल्या दोन महिन्यापासून मी प्लॅनिंग केले. मुंबईला बैठका घेतल्या.. नगरपरिषदेची सर्व प्लॅनिंग यादी मी तयार केली. मुंबईत एक कॅबिनेट बैठक वगळता मी परळीत मुक्काम ठोकून आहे. जनता आम्हाला साथ देईल आणि आमचा मोठ्याने विजय होईल.

पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, शांततेत मतदान सुरू आहे, चांगलीच गोष्ट आहे. ते शांततेच व्हायला पाहिजे जनतेला त्यांचा कोल देण्याचा अधिकार आहे. डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न केलातर पोलीस योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी. बहिण भावाच्या विधानावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, तुम्ही आम्हाला बहिण भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतच.आम्ही सिरीयस लीडर आहोत.. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत.. मी भाजपचे नेता आहे.. अशी आमची युती झाली आहे राज्यात ठीक ठिकाणी अशी आमची युती आहे. आम्ही बहिण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहिण भाऊ नाही तर राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले नेते आहोत आपापल्या पक्षाचे. त्यासाठी आम्ही एकत्र या ठिकाणी पॅनल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles