शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अकरा फरार आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज चव्हाण फरार होता. मारहाण प्रकरणानंतर फरार असलेले सूरज चव्हाण पोलिसांना शरण आला आहे, सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात होते. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना जामिन ही मंजूर झाला आहे. लातूर पोलिसांनी सुरज चव्हाण यांना पाठीशी घालत, कमालीची गुप्तता पाळली होती. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले नंतर पहाटे जमानत देखील मिळाली. या घटनेनं पुन्हा एकदा मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. रात्री सूरज चव्हाण पोलिस ठाण्यात दाखल झाले, त्यानंतर लगेचच जामीनाची प्रक्रिया झाली. जबाब नोंदवून बाहेर पडला, या घटनेनं शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.
लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.


