मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय. माझे मामा जयंत पाटीलयांना भेटायची माझ्यात हिंमत नाही. त्यांना सांगितलं देखील नाही. तसेच शरद पवार यांना देखील भेटायची हिमंत नाही. मात्र मी मतदारसंघातील अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतोय. ज्यांच्या जीवावर मी हा संघर्ष करत आलोय त्यांचा भावनांचा देखील मला विचार करावा लागेल. मला माझ्या कार्यकर्त्यांच राजकारण बघायच आहे. मला आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलण देखील अवघड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट; आजवरच्या संधीबद्दल मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज (30 मे) दुपारी ३ वाजता भाजपमधे प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे बॅनर देखील मुंबईतील भाजप कार्यालयजवळ लावण्यात आले आहेत.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा पक्ष प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि आपण पक्ष का सोडत आहोत, याची माहिती दिली. यानंतर आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज तनपुरे भाजपमधे प्रवेश करतील. सुप्रिया सुळे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात वायबी चव्हाण सेंटर येथे 10 मिनीट चर्चा झाली. भेटीत प्राजक्त तनपुरे यांनी आपण भाजपमधे प्रवेश करत असल्याची सुप्रिया सुळे यांना माहिती दिली. यावेळी पक्षाकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या संधी बाबत तनपुरे यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानले.खरे तर मी राष्ट्रवादीचा पहिला आमदार होतो. अजित पवार भाजपमध्ये जातायत लक्षात आल्यावर सगळ्या आमदारांनी पत्रावर सही करून देखील मी सही न करता बैठकीतून बाहेर पडलो होतो. यावर आता जास्त बोलता येणार नाही. असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले. दरम्यान तुम्ही सेक्युलर मतांशी प्रतारणा करताय, ज्यांनी तुम्हाला मंत्री केल आज त्यांची साथ तुम्ही सोडताय, असा प्रश्न उपस्थित केल्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले. कि मी कायम पक्षनिष्ठ राहिलो आहे. सत्तेविरोधात मी लढत राहिलो आहे. अनेकदा मला सत्तेसाठी संधी आली होती. मात्र आज ज्यांच्या जीवावर मी संघर्ष करतोय, त्यांची भावना लक्षत घेता मी हा निर्णय घेतोय. असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.


