राज्यात मान्सूनचं आगमन ; महाराष्ट्रात धो-धो पाऊस ,पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मात्र तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र अजूनही मान्सूनने व्यापलेला नाहीये. येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या स्थितीमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस झालाच नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनच्या पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान पुढील 15 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कसं असेल? कोणत्या भागांमध्ये पाऊस होईल याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, परंतु तरी देखील अजूनही अनेक भागांमध्ये पाऊस झालेलाच नाहीये. मान्सूनच्या पावसाला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. मात्र तेरा जूनपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 13 जून ते 20 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु या पावसाचं प्रमाण हे एक दिवसाआड असं राहील, म्हणजे एक दिवस पाऊस पडेल, दुसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही, असं या पावसाचं स्वरुप असेल, हा पाऊस विखुरला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की यंदा राज्यात तीन टप्प्यात पेरण्या होतील, पहिला टप्पा असेल एक ते सात जूनचा तर या काळात केजच्या पलिकडच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस चांगला झाल्यानं त्या भागात तसेच सातारा, सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पेरण्याला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यात 20 जून ते 30 जून या दरम्यान एक दोन मोठे पाऊस होतील, त्यावेळी पेरणीचा दुसरा टप्पा होईल, राज्यात सामान्यपणे दरवर्षी मुंबईकडून पाऊस येतो, परंतु यावर्षी पावसाने दिशा बदलली आहे. या वर्षी काही पाऊस हा तेलंगणाकडून येईल, तर काही भागात पाऊस हा कर्नाटक राज्याच्या दिशेनं येईल, असंही यावेळी डख यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles