जिल्हा सत्र न्यायालयाने शरद पवार यांना जामीन अर्ज फेटाळला

जिल्हा सत्र न्यायालयाने शरद खंडू पवार यांना जामीन अर्ज फेटाळला

अहील्यानगर -किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद खंडू पवार याचा जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे.

सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शदर खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.

या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक केली होती. अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे यांच्या न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले होते.न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न यापुर्वी केले होते.

याबाबतची सुनावणी शुक्रवारी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles