Saturday, January 24, 2026

नगर शहरातील विनापरवाना फलक महानगरपालिकेने कारवाई करून हटवले

शहरातील विनापरवाना फलक महानगरपालिकेने कारवाई करून हटवले

अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी गुन्हे दाखल करणार; आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर – महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. दंडही वसूल करण्यात आला होता. आता पुन्हा फलक हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गुन्हेही दाखल करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्ते महानगरपालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. महानगरपालिकेने अशा अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सुमारे ४० पेक्षा अधिक फलक कारवाई करून हटवण्यात आले आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

तसेच, महानगरपालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी नागरिक, संस्था, व्यवसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज करून व शुल्क भरून परवानगी घ्यावी. शहरात विनापरवाना फलक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles