राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले,

आपल्या धडाडीच्या कारवाईने पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे, पुन्हा एकदा गुटखा विक्रेते आणि मेडिकल क्षेत्रातील काळे धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत. त्यावर, आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना तुकाराम मुंढेंकडून सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, या कारवाईंचं स्वागत करत तुकाराम मुंढेंचंही त्यांनी कौतुक केलंय. तुकाराम मुंढे धडक कारवाई करत असतील तर चांगली गोष्ट आहे. अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहेत, या सगळ्यात भेसळ सर्रास होते हे सगळ्यांना माहिती आहे. मी स्वत: फोन करुन त्यांना सांगितलं की, दुधामध्ये भेसळ होतेय, कसले कसले केमिकल त्यात टाकले जातात. त्यामुळे, किडन्यांचे रोग वाढतात, म्हणून लोकांचं भविष्यच उध्वस्त होतं. तुम्ही यावर जास्त जोर द्या, जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

अन्न धान्य, औषधे यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना मकोका लावायचा असेल तर लावलाच पाहिजे. कारण, तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही खोट्या औषधांतून लोकांचे जीव घेता, म्हणून अवश्य कारवाई करा, असेही सांगितल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles