Wednesday, November 12, 2025

राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेचा खुलासा…’त्या’ महिलांसोबत ….

राज्यातील पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला. काही दिवसांपूर्वी अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती समोर आली होती. नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन संबंधित महिलेने काही व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी सुरू केली. त्यानंतर संबंधित महिलेनं करूणा मुंडेंकडे धाव घेतली. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करूणा मुंडे यांनी या महिलेची बाजू मांडली.संबंधित महिला मुळची नाशिकमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. ती सध्या ठाण्यात वास्तव्यास आहे. या महिलेनं नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये काहींशी शारीरिक संबंध ठेवले नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं, अशी माहिती समोर आली होती. या महिलेनं आतापर्यंत अनेक अधिकारी आणि मंत्र्यांना जाळ्यात ओढल्याचं सांगितलं जात आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून या महिलेनं मोठी आर्थिक रक्कम जमावल्याची माहिती समोर आली होती.

आता संबंधित महिलेनं थेट करूणा मुंडेंची भेट घेतली. तसेच त्याच्यांसमोर आपबिती सांगितली. आज मंगळवारी करूणा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत महिलेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘राज्यात सध्या महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यासोबत उपस्थित असलेल्या महिलेवर २ पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. संबंधित महिलेनं तक्रार करायचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिच्यावर आणि तिच्या मुलीवर गुन्हा दाखल केला. रक्षकच भक्षक झाले आहेत, या महिलेच्या बाजूनं कुणीही बोलण्यास तयार नाही’, असं करूणा मुंडे म्हणाल्या.

यावेळी संबंधित महिलाही उपस्थित होती. तिनं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘उत्तम कोळेकर नावाचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी सुरूवातील माझ्यासोबत ओळख काढली. नंतर नंबर शेअर करत बोलायला सुरूवात केली. त्यांनी मला पोलीस स्टेशनवर चहा पिण्यासाठी बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांच्या बायकोचा फोन आला. त्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्या घरी गेले. पण तिथे बायको नव्हती, इंद्रजीत कारले नावाचा एसीपी होता. या दोघांनी मिळून मला गुंगीचं औषध दिलं अन् बलात्कार केला’, असा आरोप महिलेनं केला.

‘मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून माझा जबाबही घेण्यात आला होता. महिला पोलीस अधिकारी पीआय ढमाळ यांनी मला शांत बसायला सांगितलं. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या मुलीवर गुन्हा दाखल केला, माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला’, असं संबधित महिला म्हणाली.

‘या २ पोलीस अधिकाऱ्यांनी घाटकोपरमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात’, असं संबंधित महिलेनं सांगितलं. महिलेनं याची माहिती देताच करूणा मुंडेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles