अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीसाठी
२३ जुलै रोजी सरपंच आरक्षण सोडत
अहिल्यानगर, दि. २२- सन २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार, अहिल्यानगर यांनी दिली आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीसाठी २३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली आहे. तसेच २३ जुलै रोजी दुपारी १ वाजता उप विभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम जाहीर
- Advertisement -


