शेतकऱ्यांनो सावधान! ३० जूनपूर्वी ‘हे’ १ काम न केल्यास हक्काचे २००० रुपये बुडणार…..

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असतं. महाराष्ट्रात सध्या पीएम किसान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहे. त्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तर त्याचा २३वा हप्ता लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कामं आधीच करून ठेवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला याचा मिळणार नाही.
पीएम किसानचा २३ वा हा जून-जुलै महिन्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. कारण मागील काही वर्षांच्या अंदाजानुसार जून ते जूले महिन्या दरम्याने पीएम किसान योजनेचा हप्ता पाठवला जातो. पण तुम्ही ईकेवायसीची प्रोसेस पूर्ण केली नसेल तर तुम्हाला येणार नाही. त्यामुळे ३० जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा.असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
कृषी विभाग

केंद्र सरकारकडून पीएम किसानच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे वार्षिक पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ते ३० जूनपर्यंतच ईकेवायसी राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३० जूनपर्यंत ईकेवायसी पूर्ण न करणांऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.
ई-केवायसी कशी कराल?

शेतकरी जवळच्या जनसेवा केंद्रात (CSC) जाऊन आधार कार्डच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया सोपी आहे. काही मिनिटांत पूर्ण होते.कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्री (Farmer Registry) करण्याचंही आवाहन केलं आहे. फार्मर रजिस्ट्री न केल्यामुळे भविष्यात खत आणि बियाण्यांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. फार्मर रजिस्ट्रीसाठीही ३० जून हीच अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles