Saturday, February 21, 2026

शासकीय रकमेचा अपहार ……. जिल्ह्यातील महिला सरपंच व सदस्यांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहिल्यानगर – जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे ग्रामपंचायत खात्यातील रक्कम काढून शासकीय रकमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1952 कलम 14 ( ग) नुसार सरपंच संगीता संजय अनभुले व सदस्य मंदाबाई रमेश अनभुले यांचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे

घुमरी ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब बबन अनभुले एडवोकेट शिवाजीराव मारुतीराव अनभुले, संजय अशोक अनभुले , सचिन काशिनाथ अनभुले यांनी सरपंच संगीता अनभुले व ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई अनभुले यांनी आपल्या मुलांच्या नावे शासकीय रकमांचे धनादेश काढून अपार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची चौकशीसाठी नेमणूक केली होती. ग्रामपंचायत च्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मुलांच्या नावे धनादेश काढण्याचा अहवाल त्यांनी उपमुख्य कार्यकारी यांना दिला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1952 कलम 14 ( ग) नुसार सरपंच संगीता संजय अनभुले व सदस्य मंदाबाई रमेश अनभुले यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला दिनांक एक एप्रिल 2021 रोजी 25 हजार 560 रुपये ग्रामपंचायत खात्यातून काढले आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles