जिल्हा परिषद निवडणुक ; एकनाथ शिंदे नाराज; मंत्री आणि आमदारांकडून राजीनाम्याचा इशारा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक राड्याचे पडसाद आज मुंबईत मंत्रालयात उमटत आहेत. संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मदत केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला. यानंतर शिवसेना मंत्र्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात शिवेसना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतप्त झाले. शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्रींनीही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांने एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोललं पाहिजे असं आमदार आणि मंत्री म्हणाले. त्यावरुन साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी भाजप नेते मंत्री जयकुमार गोरे यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर मग सभागृहाचं कामकाज स्थगित झालं.

दरम्यान, अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली. तर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली. तिकडे शिवसेना आक्रमक झाली असताना, भाजपनेही तशीच भूमिका घेतली आहे. सातारा निवडणुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles