अहिल्यानगर श्रीगोंदा मतदार दुबार मतदारांचा घोटाळा उघडकीस ;राष्ट्रवादीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.
दुबार मतदारांचा घोटाळा उघडकीस – श्रीगोंदा व अहिल्यानगर मतदार यादीवर गंभीर प्रश्नचिन्ह.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेतील दोन मतदारसंघांमध्ये आढळलेल्या गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मनपा आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवला आहे. मतदार याद्यांच्या पारदर्शकतेला आणि निष्पक्षतेला धक्का देणारा हा प्रकार असून लोकशाहीवरील विश्वास डळमळीत करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ आणि अहिल्यानगर महापालिका प्रारूप मतदार यादी या दोन्ही ठिकाणी एकाच मतदारांची नावे मोठ्या संख्येने नोंदवली गेल्याचे आढळले आहे. तब्बल ४३८१ मतदारांची नावे ‘श्रीगोंदा’ मतदारसंघातील असून, तीच नावे अहिल्यानगर शहराच्या यादीतही दिसत असल्याचा धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. हा आकडा स्वतःच प्रशासनाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो.
अभिषेक कळमकर यांनी याबाबत प्रशासनाच्या कामकाजावर कठोर शंका व्यक्त करत,अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून तर हे सर्व करत नाहीयेत ना? अशा प्रमाणात एका विशिष्ट मतदारसंघातील नावे दुसऱ्या यादीत कशी आली? हा निव्वळ तांत्रिक दोष आहे की नियोजित प्रयत्न, याचा जनतेला आणि आम्हाला स्पष्ट खुलासा हवा, असा थेट सवाल उपस्थित केला. यापुढे, जास्तीत जास्त दुबार नावे ही श्रीगोंदा मतदारसंघातील मांडवगण जिल्हा परिषद गटातून आली आहेत, असा ठोस दावा कळमकरांनी निवेदनात केला. एखाद्या विशिष्ट गटातील नावांची एकत्रित घुसखोरी हा केवळ अपघात नसून मतदार यादीमध्ये जाणूनबुजून केलेली घोटाळेबाजी असू शकते, असे संकेत ते देतात. कळमकरांनी पुढील कार्यवाहीसाठी स्पष्ट मागणी करत म्हटले की,
संबंधित अधिकारी यांनी या अनियमिततेचा तातडीने सखोल तपास करावा, आणि जबाबदारांवर तडकाफडकी कारवाई करावी. तसेच खऱ्या-अचूक मतदारांची नावे यादीत समाविष्ट करून लोकशाही प्रक्रियेला न्याय द्यावा. मतदार यादीतील ही धक्कादायक विसंगती प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह तर लावतेच, पण येऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेवरही संभाव्य परिणाम घडवू शकते. म्हणूनच या प्रकरणाचा तातडीने तोडगा निघणे आवश्यक असल्याचे अभिषेक कळमकर यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेश मालपाणी, रोहन शेलार, अमोल खाडे, परवेज शेख, अल्तमश जरीवाला, राम झीने, राहुल घोरपडे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles