Saturday, November 15, 2025

पावसाचा हाय अलर्ट, हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर 2 जिल्ह्यात शाळा, कॉलेजला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पावसाचा हाय अलर्ट, हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर 2 जिल्ह्यात शाळा, कॉलेजला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

भंडारा : विदर्भाने पावसाने धुव्वादार आगमन केलं असून येथील विविध जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील काही जिल्ह्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात शाळा , कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहे. हवामान विभागानं उद्या 25 जुलै रोजी भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं उद्या भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अतिवृष्टी झाल्यास कुठलीही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर पडू नये, यासाठी भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी उद्या सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी जाहीर केली आहे.

भंडाऱ्यासह चंद्रपूर जिल्ह्यात देखील हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर उद्या जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, अंगणवाड्यांनाना सुट्टी जाहीर केली असून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी हा सुट्टीचा आदेश केला असून अतिवृष्टी काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, अद्यापही काही भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles