लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता लांबणीवर जाणार
ऑगस्ट महिन्यात लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार
रक्षाबंधनच्या दिवशी सणासुदीला हे पैसे जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधीपर्यंत येणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच ही माहिती दिली जाईल.जुलै महिना संपायला अवघे ५ दिवस उरले आहेत. त्यामुळे पैसे कधी जमा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, जुलै महिन्याअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पैसे जमा होऊ शकतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे जमा केले जातील. ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला रक्षाबंधन आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
रक्षाबंधन हे ९ ऑगस्ट रोजी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन अजून चांगले होणार आहे. दरम्यान, अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लाडकी बहीण योजनेत काही महिलांच्या जुलैचा हप्ता जमा होणार नाही.दरम्यान, ज्या महिला निकषांबाहेर आहेत तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत. ज्या महिला कर भरतात. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे


