शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, शाह सैना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. नाशिकची उमेदवारी मागे घेतली तरीही लोकांनी कसे मतदान केले, हा चमत्कारच म्हणावा लागेल. हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपाचे यांना सुरक्षित ठेवले होते, ठाण्यात. आपल्या सर्वांनी माहिती आहे की, एकनाथ शिंदे यांच्या निगराणी खाली. आदल्यादिवशी ते मतदानासाठी गेले आणि शिंदेंच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केले. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केले. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडून सहकार्य मागितले. आम्ही त्यांना ते दिले. आमचे जे मतदान होते, ते आम्ही त्यांच्याकडे वळवले. त्याच्याही त्यांना फायदा झाला.
शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षात नक्की कोणत्या प्रकारची संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर जरी तुम्हाला आज हसू दिसत असले शिंदे बाजूला असताना तर ते हसू खोटे आहे. दिल्लीमधून शिंदेंना बळ दिले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी. आमच्यासारखे जे लोक आहेत, ते या घडामोडींकडे सध्यातरी दुरून पाहत आहेत.पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपाने पाडला.. ठीक आहे याला पण बंड म्हणा.. जसे ते म्हणतात. गोकुळ गीतेला धमक्या दिल्या, त्यांच्यावर दबाव आणला. शिंदे गटाने ही जी गद्दारी करून घेतली आहे , त्यावरून लोकांचा रोष दिसून येत आहे. या गद्दारीमागे स्पष्ट आहे की, आम्ही मुंबईसह राज्य पैशांनी विकत घेऊ शकतो. अस्मितेसाठी लढणारे शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत, ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो.
मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझा विजय त्यांना समर्पित करतो मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी गुप्त प्रचार केला. नाशिकमध्ये निष्क्रिय उमेदवार दिलेला होता. महायुतीच्या नेत्यांच्या शब्दाला मी मान दिला आणि प्रचार थांबवलेला होता. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवलं. त्यासाठी मी माफी मागतो, असं गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी, इस्लाम पार्टीने मदत केली. त्यांचे आभार मानतो. एकनाथ शिंदेंना भेटण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा असल्यास माझ्या कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेईन, असं गोकुळ गीते म्हणाले.


