राज्य सरकार कडून जनतेच्या पदरी निराशा, संभाजी ब्रिगेडची सरकार विरोधात आक्रमक भूमिका
अहिल्यानगर : राज्यात महायुतीचे सरकार येवून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. हे सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. सरकारच्या कारभाराबाबत जनतेमध्ये निराशा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदान उतरणार आहे. याबातचा निर्णय आज अहिल्यानगरमध्ये घेण्यात आला. अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगहावर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना बांधणी करण्यात आली. या बैठकीत निरिक्षक कमिटीचे सदस्य व प्रदेश संघटक डॉ बालाजी जाधव, अतुल गायकवाड, रमेश गायकवाड, राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. सुरेश इथापे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ बालाजी जाधव म्हणाले की, राज्यात सरकार येवून जवळपास सहा महिने उलटले आहे. परंतु, अद्यापही शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी आदीचे प्रश्न जैसे थे आहेत. जर सरकारला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांना टाळ्यावर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेत असून संभाजी बिग्रेड ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक आंदोलने करुन अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
अतुल गायकवाड यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही अपप्रवृत्ती खोटा इतिहास समाजात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना देखील संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देत खरा इतिहास हा बहुजन समाजाच्या समोर आणला आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी केली आहे. मात्र, नाकर्ते सरकार भाव देण्यासाठी अनुकूल नसल्याने आता राजकीय पटलावर संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे यासाठी संभाजी ब्रिगेडने काम करत आहे.
रमेश गायकवाड यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेड आता राजकारणाच्या मैदानात उतरल्याने अनेकांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व कक्षांची जिल्हयात बांधणी केली तर राजकिय सत्ता दुर नाही.
राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हयात संभाजी ब्रिगेडचे काम अतिशय चांगले असून भविष्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी गाव गाव पिंजून काढले असून जिल्हयात ३५० च्या वर शाखा कार्यरत असल्याने इतर कक्षांची देखील बांधणी होणे गरजचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हयात संभाजी ब्रिगेड सक्षम असून इतर कक्षांची देखील लवकरच बांधणी पुर्ण करणार आहे. जिल्हयात संभाजी ब्रिगेडच्या शाखा गाव तेथे करण्याचा राजेश परकाळे यांचा मानस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बहुजन समाजातील जनतेला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. संभाजी ब्रिगेडची बांधणी करताना अनेक अडचणी आल्या त्यावर मात करत आज जवळपास ३६० शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. परंतु यावर आपण थांबणार नसून गाव तेथे शाखा असा आपला पुढील अजेंडा आहे. येणार्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवणारच असा मानस व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेडच्या महिलाध्यक्षा राजेश्री शिंदे म्हणाल्या की, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण दोन महिन्यापासून काम करत आहोत. यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांना आपल्या पायवर उभा राहण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी विविध प्रकारचे कॅम्प आयोजित करणार असून महिला सक्षम झाली तर संपुर्ण घर सक्षम होते या प्रमाणे महिला उद्योजिका तयार करण्याचा मानस आहे.
या बैठकीत आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या अँड दामिनी नगरे तसेच विविध संघटना व पक्षाचे सतीश नाना श्रीराम, प्रफुल्ल (बापू) जगताप, सौरभ शितोळे सर, पांडुरंग अंकुश खोरे, संदीप शिवाजी गोरे, कय्युम हैदर शेख, सुरजित गायकवाड, शुभम सांगळे, कृष्णा जगताप, आयुब शेख, संगीता बाबासाहेब शिंदे, जयश्री रोहकले, संपत जाधव, अँड सोमनाथ गोपाळे, संतोष भिसे, रामकृष्ण पवार नितीन शेलार, सज्जन पोकळे, रमजान शेख, सुशेन कदम, नागेश खेडकर, अमोल आरडे, अनिकेत शिंदे, वैभव काळदाते आदींनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला.
या बैठकी साठी जिल्हा महासचिव निलेश बोरुडे, प्रवीण भोर, जिल्हा कार्याध्यक्ष शरद जोशी, सुदाम कोरडे, दत्ता भोसले, राजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देठे, सुनील जगताप, इंजि विशाल मांडगे, अंकुश जगताप, अरविंद गेरंगे, प्रशांत औटी, संजय सोनवणे, अवि मेढे, बंटीभाऊ भिंगारदिवे, लक्ष्मण खोडदे, तालुकाध्यक्ष डॉ राहुल देशमुख, इंजि शाम जरे, सचिन काकडे, लक्ष्मण गायके, वैभव लाळगे, राजू काटकर, सूरज कराळे आदी उपस्थित होते.


