सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांच्यावर राजकीय दृवेषातून केलेल्या ४२० च्या खोट्या गुण्यातून अटकपूर्व जामीन मंजूर.
राजकीय दबावाखाली दोन खोटे गुन्हे दाखल केला असल्याचा आरोप.
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, माझ्यावर राजकीय दृवेषातून ४२० चा व आणखी एक असे दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व माझी राजकीय कारकीर्द संपवण्याच्या हेतूने व समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने शेवगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी काही राजकीय विरोधक यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याशी सगंमत करून कोणताही संबंध नसताना देखील ४२०चा गुन्हा दाखल करून घेतला.
विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य हे पद भूषवले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणूक निरीक्षक २०२४ चे काम केलेले आहे तसेच पक्षनिरीक्षक ओबीसी या पदावर सुद्धा कार्यरत होते मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्ष शिंदे गटात प्रवेश करून पदाधिकारी म्हणून समाजामध्ये काम करत होते वेगवेगळ्या पक्षात अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्याने समाजामध्ये अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याने समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा आहे. व मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्ष शिंदे गट मध्ये विद्या गाडेकर यांनी प्रवेश केल्यानंतर पक्ष माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे तयारीत होते व पक्ष मोठी जबाबदारी देईल अशी दुष्ट भावना काही राजकीय विरोधक यांच्या मनात येऊन राजकीय विरोधक यांनी माजी समाजामध्ये कशी बदनामी होईल व मला कसा मानसिक त्रास होईल व राजकीय कारकीर्द कशी संपेल या दुष्ट भावनेने पोलीस निरीक्षक शेवगाव यांना हाताशी धरून सगममत करून राजकीय दबावाखाली येऊन कोणत्याही घटनेची चौकशी न करता व विचारपूस न करता दोन खोटे गुन्हे दाखल केले आहे या सर्व गुन्ह्याची पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. व शेवगाव पोलिसांनी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी न देता राजकीय दबावाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आमची समाजामध्ये बदनामी केलेली आहे. सदर बदनामीस पोलीस प्रशासन संपूर्णपणे जबाबदार आहे सदर बदनामीमुळे व खोटे गुन्हे दाखल झाल्याने शारीरिक व मानसिक स्थिती खालावलेली आहे त्यामुळे माझ्या वरील प्रमाणे खोटे गुन्हे दाखल झाले असल्याने त्याची चौकशी करून मला त्या गुन्ह्यातून वगळण्यात यावे व संबंधित पोलीस प्रशासन यांच्यावर त्वरित कारवाई करुन राजकीय वरदहस्त असलेला तो व्यक्ती शोधून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला.
आम्हाला आमची बाजू न मांडून देता राजकीय दवाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे व यामध्ये पोलीस प्रशासन संपूर्णपणे जबाबदार असून ज्या व्यक्तींनी पोलीस प्रशासनावर आपल्या राजकीय दबावाचा बोजा टाकलेला आहे त्या व्यक्तींवर देखील कारवाई करण्याची मागणी करून मी महिला असल्याने हा माझा छळ सुरू आहे. परंतु मी अहिल्याबाई होळकरांच्या जिल्ह्यातील असून विरोधकांना कामातून उत्तर द्यायला समर्थ आहे असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या विद्या भाऊसाहेब गाडेकर.


