अहिल्यानगर -स्टेशन रोडवरील न्यू बेथेल कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात प्रदीप किसन साठे (वय 40) हे जखमी झाले असून, त्यांनी धाकटा भाऊ सुमीत उर्फ निखील किसन साठे (वय 38, रा. न्यू बेथेल कॉलनी) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. प्रदीप साठे हे पत्नी व मुलांसह काही काळापासून विनायकनगर येथे सासरी राहत होते. दोन महिन्यांपूव डोळ्याच्या ऑपरेशनमुळे नोकरी गेल्याने ते आपल्या आई-वडिलांच्या घरी न्यू बेथेल कॉलनीत परतले. त्यांचा लहान भाऊ सुमीत याला दीर्घकाळापासून दारूचे व्यसन असून, तो अनेक वर्षांपासून एकटाच राहत होता. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता, सुमीत दारूच्या नशेत घरी आला आणि मोठा भाऊ प्रदीप यांना तू इथे राहायचे नाही, नाहीतर तुझा मुडदा पाडीन अशी धमकी देत शिवीगाळ केली. यावर प्रदीप यांनी प्रतिकार केला असता, सुमीतने हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष बनकर करत आहेत.
नगर शहरात धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर चाकूने वार
0
45
Related Articles
- Advertisement -


