अहिल्यानगर – पारनेर व बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी विशेष पोलीस पथकासह केलेल्या कारवाईत राज्यात विक्रीस बंदी असलेला ५,५२,८८० रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला, सुगंधी तंबाखू, व चारचाकी वाहनासह ५ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे हे ७ जुलै २०२५ रोजी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, निघोज ता. पारनेर बस स्थानक समोरील रस्त्यावरुन एक मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पान मसाला, गुटखा वाहतूक करणार आहेत. या माहितीनुसार
विशेष पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असताना, थोड्याच वेळात निघोज बस स्टैंड समोरील रस्त्यावरुन एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी येताना दिसली. पोलीस पथकाने इशारा करुन सदर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैध गुटखा त्यामध्ये सुगंधी तंबाखू, विमल पानमसाला बॉक्स मिळून आले. मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत चालक अक्षय भास्कर लाळगे वय-२७ वर्षे रा. लाळगे मळा, निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर याने सदरचा मुद्देमाल हा आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख रा. भिंगार ता. नगर जि. अहिल्यानगर (फरार) व इशान जाकीर शेख रा. गजानन कॉलनी, फकीर वाडा ता.जि.नगर (फरार) याचे मालकीचा असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष गाडीमध्ये मिळून आलेला एकूण ३६,९८६ रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू, विमल, पानमसाला तसेच ४,५०,००० रु. किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी तिचा क्र. MH-१२-VF-३२८६ असा एकूण ४,८६,१८६ रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पारनेर पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष प्रतिबंधीत अन्न पदार्थांच्या साठ्यामधून प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविणेकामी वेगळे करुन बाकी मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन आरोपींविरुध्द पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं.५४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ.खाडे हे ७ जुलै २०२५ रोजी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई करत असताना त्यांना माहिती मिळाली की, गव्हाणेवाडी परिसरात करण भरत काळे रा. सोनलकर वस्ती गव्हाणेवाडी व अनिकेत सोनवणे (पूर्ण नाव माहित नाही) रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा यांनी करण भरत काळे याच्या घराच्या आडोशाल पान मसाला, गुटख्याची साठवणूक केली आहे. या माहितीनुसार
सदर ठिकाणी जाऊन करण भरत काळे रा. सोनलकर वस्ती, गव्हाणेवाडी ता. श्रीगोंदा याच्या घराच्या आडोशाला पाहणी करुन पंचांसमक्ष छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले .पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतू ते मिळून आले नाही.
सदर ठिकाणी ६६,६९४ रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू, गुटखा पानमसाला मिळून आल्याने १) करण भरत काळे रा. सोनलकर वस्ती गव्हाणेवाडी (फरार) २) अनिकेत सोनवणे (पूर्ण नाव माहित नाही) रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा (फरार) यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधीत तंबाखू, गुटखा पानमसाला विक्रीसाठी वाहतूक करणारे व साठवणूक करणारे ५ आरोपींविरुध्द कारवाई करुन एकूण ५,५२,८८० रु. किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये १,०२,८८० रु. किंमतीची सुगंधी तंबाखू, विमल, पानमसाला तसेच ४,५०,००० रुपये किंमतीचे १ चारचाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आल्याने २ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेकों मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ दिनेश मोरे, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉसंभाजी बोराडे, पोकॉ विजय ढाकणे, पोकॉ दिपक जाधव, पोकॉ जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.


