Wednesday, November 12, 2025

Ahilyanagar crime news: वेटरने केला युवकाचा खून गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा येथे एका हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास काही कारण नसताना वेटरने तरुणास लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक प्रविणकुमार लोंखडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली.ज्योतीराम शामराव काशिद (वय 36, रा. सारोळा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ लक्ष्मण शामराव काशिद (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक गुलाबराव सातपुते (रा. मनमाड, जि.नाशिक) याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी लक्ष्मण काशिद यांचा भाऊ ज्योतीराम काशिद हा दि. 17 रोजी सायंकाळी घरातून मोबाईलवर बोलत घराबाहेर गेला होता. मात्र रात्रभर तो घरी आलाच नाही. मयताचा भाऊ लक्ष्मण काशिद याने त्यास सकाळी फोन लावला, मात्र त्याने फोन उचलला नाही. यानंतर सकाळी साडेनऊ वाजता मयताचा भाऊ यास समजले की त्याच्या भावाला शिऊर फाटा येथील एका हॉटेलमध्ये मारहाण झाली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर मयताचा भाऊ आपल्या नातेवाईकांसमवेत घटनास्थळी आला आणि त्या ठिकाणी रक्ताने भरलेली काठी दिसून आली.

यावेळी त्या ठिकाणी आरोपी वेटर दीपक सातपुते याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल करीत सांगितले की, मीच मयत ज्योतीराम काशिद यास काही कारण नसताना लाकडी काठीने मारहाण केली आहे. या मारहाणीत ज्योतीराम काशिद याचा मृत्यू झाला आहे. मयत ज्योतीराम काशिद यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, नवनाथ शेकडे, गणेश काळाने आणि कुलदीप घोळवे हे घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले. यानंतर देवीदास पळसे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना माहिती दिली. यानंतर कोठारी रुग्णवाहिका व सोबत दीपक भोरे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत ज्योतीराम काशिद याचा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles