‘अप्पू हत्ती चौक’ आता ‘वीर लहुजी वस्ताद साळवे चौक’— आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने नगर मनपाची मंजुरी.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)– अहिल्यानगर शहरातील अप्पू हत्ती चौक आता ‘वीर लहुजी वस्ताद साळवे चौक’ या नावाने ओळखला जाणार आहे. सकल मातंग समाज च्या मागणीला आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने आणि नगर महानगरपालिकेच्या मंजुरीनंतर या नामांतराचा निर्णय अंतिम झाला असून, या निर्णयाने बहुजन मातंग समाजात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मातंग समाजाच्या वतीने नगर महानगरपालिकेकडे अप्पू हत्ती चौकाचे नाव बदलून ‘वीर लहुजी वस्ताद साळवे चौक’ असे करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आल्याने समाजातील बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. या नामांतरामुळे वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक कार्याला आणि त्यांच्या प्रेरणादायी संघर्षाला नव्या पिढीसमोर उजाळा मिळणार आहे. त्यांच्या शौर्य, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या आनंददायी प्रसंगी समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून व फटाके वाजवून आनंद साजरा केला या वेळी अंकुश मोहिते, राम वडागळे, अजय पठारे, जय भोसले, सुनील उमाप, पप्पू पाटील, विजय वडागळे, मनेष साठे, भारत पवार, सुनील सकट, राम काते, शाहुराजे वडागळे, श्रीकांत घोरपडे, अश्विन खुडे, प्रकाश वाघमारे, सागर साठे, पोपट पाथरे, अशोक शिंदे, संजय चांदणे, अशोक भोसले, विजय घोरपडे, यशोदास वाघमारे, बाबु पाचारणे, गुलाब गाडे, रंजीत वैरागर, विशाल चांदणे, अजय त्रिभुवन, सुनिल ढोले, अनिकेत भोसले, लखन वाघमारे, दिपक सरोदे, प्रवीण कांबळे, ऋषी कराळे, नितीन खांडरे आदींसह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयाबद्दल सर्व मातंग समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
अहिल्यानगर शहरातील ‘अप्पू हत्ती चौक’ आता या नावाने ओळखला जाणार
- Advertisement -


