डान्स बारमुळे राज्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याच्या घटनांची गंभीर दाखल घेत राज्य सरकारने काही वर्षापूर्वी डान्सबार प्रतिबंधक कायदा केला.सुरुवातीला पाच वेळा हा कायदा रद्दबातल ठविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानेही आता या कायद्याला मान्यता दिली आहे. मात्र हा कायदा डान्सबारच्या मुळावर उठू लागतात बारामालकांनी आता नवीन शक्कल लढविली आहे. राज्य सरकारच्या केलेल्या डान्सबार नियमान कायद्यातून पळवाटा शोधत डान्सबार मालकांनी नवीन उद्योग सुरू केला आहे. मात्र ही बाब सरकारच्या लक्षात येतात डान्सबार मधील छम छम कायमची बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
मनोरंजन करण्याच्या नावावर परवाना घेऊन त्याखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असा नवा कायदा याच अधिवेशनात मंजुरीसाठी आणण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.याबाबत चा मूळ प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता त्यावर अजय चौधरी, रईस शेख, सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न विचारले. वारंवार गुन्हे करणाऱ्या परवाना धारकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही नवीन कायद्यात करण्याचा प्रयत्न आहे असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आर्केस्ट्रा बारबाबत नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने केलेल्या डान्सबार नियमन कायद्यानुसार ठाण्यातील एकाही डान्सबारला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र बारचालकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलं ३३ चा वापर करा सार्वजनिक मनोरंजन नियमावलीनुसार परवाना घेत आर्केस्ट्रा बार सुरू केले आहेत. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून यापुढे कोणत्याही बारला परवानगी हवी असेल तर त्यांना डान्सबार नियम कायद्यामुळेच परवानगी घ्यावी लागेल. महाराष्ट्र पोलीस कायद्यातून डान्सबारला परवानगी दिली जाणार नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे एखाद्या बारा मालकाने वारंवार गुन्हा केल्यास त्याच्यावर त्याचे परवाना कायमचा रद्द केला जाईल असेही फडणवीस यांनी जाहीर केले.


